करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मुलींचा घटता जन्मदर .. जिल्ह्याच्या तुलनेत करमाळा पिछाडीवर

करमाळाविशाल घोलप

मुलींच्या जन्माचा दर हा जिल्ह्यात समाधानकारक असला तरी करमाळा तालुक्यात मात्र हा जन्मदर अत्यंत कमी आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास ९३७ च्या सरासरीने जिल्ह्याचा दर असला तरी करमाळ्याच्या मात्र ८९८ असा आहे. याचाच अर्थ १ हजार मुलांच्या पाठीमागे केवळ ८९८ मुलींचा जन्म करमाळा तालुक्यात होत आहे. या मागचे कारण गर्भलिंग निदान असल्याचे संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता प्रशासन सक्रिय झाले असून संशयतांना कठोर शासन करण्याच्या विचारात आहे.

आपण अनेकदा मुलांचे लग्न जमत नाहीत मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे असे ऐकून आहोत. यासाठी शासन कठोरातील कठोर नियम तयार करून अशा घटनांवर चाप लावत आहे. मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून स्त्रीभ्रूणहत्या व इतर कायदे शासनाच्या वतीने तयार करण्यात आले आहेत. याचा प्रभाव म्हणून सध्या जिल्ह्याच्या दर जन्मदरात वाढ झाली असली. तरी करमाळ्यातील प्रमाणामुळे मात्र चिंतेच वातावरण तयार झाले आहे. मुळातच सदरचा जन्मदर हा कमीत कमी ९५० पर्यंत असायला हवा पण जिल्ह्याच्या सरासरीच्याही बराचसा मागे करमाळ्याचा जन्मदर असल्याचा दिसून येत आहे विशेष म्हणजे मागील वर्षी ९१८ होता त्यातही घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने संबंधितांवर शोधून कारवाई करण्याचे ठरवले आहे. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये अशा संशयित गर्भ लिंग निदान करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्याचा जन्मदर ..
करमाळा – ८९८, अक्कलकोट ९२२, मंगळवेढा ९४६, सांगोला ९२७, माळशिरस ९५१, पंढरपूर ९४९, मोहोळ ९३०, बार्शी ९७०, माढा ९५३, दक्षीण सोलापूर ९४४, उत्तर सोलापूर ९२७ असा आहे. यामध्ये सर्वात कमी करमाळा तालुक्याचा नोंदवल्याने प्रशासन ॲक्टीव मोडवर आले आहे. यासंदर्भात बैठका घेऊन डमी रुग्ण नेऊन कारवाई करण्याची यंत्रणा सज्ज केली आहे. तर गर्भलिंग निदान कोण करीत असेल तर १८००२३३४४७५ या क्रमांकावर माहीती द्यावी.

प्रतिक्रिया
सदरची बाब गंभीर असल्याने आमच्याकडुनही सर्व योग्य ते प्रयत्न केले जात आहेत. अशा सेविकाकडे नोंदी असताना त्यांनी या नोंदी व्यवस्थीत जपल्या व केल्या पाहिजेत. याच्या आधारावर कुठे काय चुकतय हे लक्षात येऊ शकते.
– मनोज राऊत, गटविकास अधिकारी करमाळा.

गर्भलिंग निदान कुठे सुरू असल्यास त्याची माहिती मिळाल्यानंतर ती माहिती आमच्यापर्यंत द्यावी. शिवाय आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा शोध सुरू केला आहे. कुठेही संशयित अशा प्रकारची कामे होत असतील तर नागरिकांनीही आम्हाला कळवल्यास यावर प्रतिबंध घालता येईल. यासोबतच जन्मलेले लहान बाळ ज्याला जन्मतः व्यंग आहे त्याचा तपासही शासकीय रुग्णालयाकडुन केला जातो अशा लोकांनीही आम्हाला संपर्क साधावा.
– गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE