करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा समाचार च्या बातमीवर शिक्कामोर्तब; प्रशासक मंडळात दोघांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी –

करमाळा समाचार ने जाहीर केलेल्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नुकतेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर दोन जणांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते देण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व पांगरे येथील संजय गुटाळ यांचा समावेश आहे.

http://*नियुक्ती होण्यापूर्वीच ‘त्यांना’ संभाव्य प्रशासक मंडळातून “डच्चू” ? नियम काय सांगतात ..* https://karmalasamachar.com/dutching-them-out-of-potential-governing-bodies-before-being-appointed/

politics

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर मागील महिनाभरापासून प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यानंतर कारखान्याची काहीच हालचाल सुरू नव्हती. तर येणारा हंगाम लक्षात घेता यावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली आहे. परंतु सदर निवड करताना अत्यंत गोपनीय पद्धतीने या निवडी करण्यात आल्या. त्यामुळे जोपर्यंत निवड होत नाही तोपर्यंत याची कल्पना कुठेच नव्हती.

सदरची निवड ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून यामध्ये आणखीन काही नावे सुचवण्यात आली होएए परंतु त्या नावांना यातून वगळण्यात आले आहे. यात केवळ दोन जणांचा समावेश केला असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची नेमकी पुढची दिशा या दोघांवर अवलंबून राहणार आहे. त्यांनी काम करताना शासन त्यांना सहकार्य करेल का ? हा मोठा प्रश्न असल्याने जर शासनाने मदत केली तरच हा कारखाना अडचणीतुन बाहेर येऊ शकतो. सभासद शेतकऱ्यांना व कामगारांना शासनाकडून आता मदतीच्या अपेक्षा राहिल्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE