राजुरी येथील तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
करमाळा समाचार – संजय साखरे
राजुरी ता करमाळा येथील प्रथमेश सुदाम साखरे, सार्थक अनिल शिंदे ,आणि वेदांत रामचंद्र शिंदे या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे. यापैकी सार्थक व वेदांत यांची यापूर्वीच सातारा येथील सैनिक स्कूल साठी निवड झाली होती.

त्यांना राजुरीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री पाटील सर ,शितोळे सर, जगदाळे सर आणि सुरवसे सर यांच्याबरोबरच कोल्हापूर येथील श्रद्धा क्लासेसचे संचालक श्री भोसले सर आणि पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल राजुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.