करमाळासोलापूर जिल्हा

शिवरत्न संस्थेच्या दिनदर्शिकेचे आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

करमाळा समाचार

शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्था, करमाळा या संस्थेच्या सन 2021 या वर्षाच्या दिनदर्शिका (कॅलेंडर) चे प्रकाशन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे शुभ हस्ते करमाळा येथे झाले.
यावेळी बोलताना आ. मोहिते पाटील म्हणाले की सातोली येथील ‘शिवरत्न’ संस्था, ही ग्रामीण भागातील युवकाना एक नवी दिशा देणारी संस्था आहे, संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेले रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व इतर विविध उपक्रम स्तुत्य आहेत.

या दिनदर्शिकेवर असलेली आत्मनिर्भर भारत व विविध योजनांची माहिती ही ग्रामीण भागातील युवकांसाठी महत्वपूर्ण व प्रेरणा देणारी आहे, ती युवकांना प्रगतीकडे नेवू शकते, असेही आ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.


याप्रसंगी भाजपा अध्यक्ष जगदिश आगरवाल, सरपंच डॉ. अमोल घाडगे, वांगीचे महेंद्र पाटील, अमरजित साळुंके, गुळसडीचे शिवाजी पाटील, रावगावचे बापूसाहेब पाटील,कंदरचे ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. अमरजित साळुंके यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE