धक्कादायक – अल्पावयीन मुलगी गरोदर झाल्यावर अत्याचार उघड ; आवाटीच्या युवकावर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
आवाटी येथील अल्पवयीन मुलीला धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी आवटी येथील सोनू उर्फ वैजनाथ बंडगर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुरुवातीला झालेल्या अत्याचाराविरोधात मुलीने काहीच न बोलल्याने मुलाचे फावले व तो वारंवार ते कृत्य करत राहिला. अखेर मुलीला दिवस गेल्यानंतर मुली वर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली आहे.

मोठे भाऊ पुणे येथे कामाला असल्यामुळे वृद्ध आई-वडिलांना जवळ दहावी पास अल्पवयीन मुलगी राहत होती. शाळा सोडल्यानंतर ती घरीच आपल्या कुटुंबियांना मदत करत होती. तर गावातीलच तरुण गुंडगिरी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यापासून ती आंतर पाळूनच होती. पण तो तिचा पिच्छा सोडत नव्हता.

एके दिवशी घरी कोणीच नसल्याचा पाहून सोनू कुर्हाड घेऊन घरी आला व अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केले. त्यानंतर शेतातही एकटीला पाहून पुन्हा एकदा अत्याचार केले. तर त्याच्यापासुन दिवस गेले असुन तो कोठे नाव घेतले तर कुटुंबाला संपवण्याची धमकी देत आहे अशी फिर्याद मुलीने त्याच्या विरोधात करमाळा पोलिसात दाखल केली आहे. तसेच त्याच्यापासून कुटुंबीयांना धोका असल्याचे सांगितले आहे. तरी या सर्व प्रकारानंतर सोनू उर्फ वैजनाथ बंडगर राहणार आवाटी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.