करमाळासोलापूर जिल्हा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रक पलटी

करमाळा समाचार 

करमाळा शहरातील पोस्ट ऑफिस जवळ ऊसाचा ट्रॅक पलटी झाला आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा ऊसाचा ट्रक पलटी झाला आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडून हा ट्रक दत्त मंदिर रोड कडे जात होता. या रस्त्यावरून कॉलेजची विद्यार्थिनी ये-जा करत असतात तसेच विविध कामासाठी तहसील, पोलीस स्टेशन , पंचायत समिती, कोर्ट कडे जाणारे नागरिक ये जा करत असतात अशा अचानक पलटी झाल्यामुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे.

तरी संबंधित अधिकारी पदाधिकारी यांनी ऊसाच्या व मालवाहतूक ट्रक बाबत योग्य ते नियोजन करावे अशी मागणी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिकांतून होत आहे. यापूर्वीही अनेकदा या रस्त्यावरून ऊस वाहतूक धोकादायक पद्धतीने केली जाते याकडे लक्ष वेधूनही व वाहतूक चुकीच्या पद्धतीने चालूच आहे. तर अपघात घडला त्या वेळी आसपास कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी यातून काहीतरी धडा घेणे गरजेचे आहे. रहदारीचा ठिकाणाहून तसेच शहरातील वाहतुकीला अडथळा होईल या पद्धतीने उसाच्या ट्रक ट्रॅक्टर ची वाहतूक केले जाऊ नये अशी मागणी नागरीक करत आहेत.

रस्त्याचीही वाट लागतेय … 

कर्णकर्कश आवाजात जाणारे ट्रॅक्टर होणारी ऊस वाहतूक यांना कोर्टाच्या दिशेने बाहेरून रस्ता असतानाही अनेकदा या गाड्या करंजकर हॉस्पिटल तसेच गायकवाड चौक येथून जाताना दिसतात. त्यामुळे वाहतुकीला तर अडचण निर्माण होतेच पण रस्त्याची ही पुरती वाट लागली आहे. तसेच गायकवाड चौक येथील वळणावर अपघात होण्याची दाट शक्यता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत हे वाहनचालक मनमानी करताना दिसतात.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE