करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सीना कोळगाव धरणाची शंभरीकडे वाटचाल ; सोळा वर्षात आठव्यांदा टप्पा गाठला

करमाळा समाचार 

तालुक्यातील महत्त्वाच्या सीना कोळगाव धरणाच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे १५० दलघमी साठा असलेले धरण सध्या ९७ टक्के पर्यंत भरलेले आहे. तर धरण परिसरासह इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सिंचन सहाय्यक सुनील सोनवणे यांनी दिली आहे. मागील पंधरा वर्षांमध्ये सात वेळा सदरचे धरण भरलेचे दिसले. तर मागील वर्षी धरणात केवळ ४० दलघमी पाणी शिल्लक होते. तर यंदा १०० टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील परांडा भागातील एकूण बारा हजार शंभर हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी सदरचा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. यामध्ये करमाळा तालुक्यातील सात गावांचा लाभक्षेत्रात समावेश झाला असला तरी करमाळा परिसरातील जवळपास १८ गावांना कोळगाव धरणाचा फायदा होताना दिसून येतो. सदरचे धरण 2००८ मध्ये पूर्ण झालेले असले तरी आतापर्यंत केवळ सात वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

politics

धरणाची क्षमता १५० दलघमी असताना यामध्ये ६१ दलघमी हा मृतसाठा मानला जातो. तर मागील वर्षी यामध्ये केवळ ४० दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होताना दिसून आली होती. सदर धरणाची परिस्थिती ही अहमदनगर जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असते. याशिवाय करमाळा तालुक्यात व परंडा तालुक्यात झालेल्या पावसाच्या भरोशावर सदरचे धरण भरले जाते. यंदा परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण ९३ टक्के पर्यंत भरले आहे. तर १०० टक्के क्षमता पूर्ण झाल्यानंतर सदरचे पाणी पुढे सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या संदर्भात पुढील आवाटी, रोसा, मुंगशी यासारख्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या गावांना लाभ …
करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. तर यामध्ये आवाटी, गौंडरे, निमगाव, फिसरे, सालसे, कोळगाव, हिवरे, हिसरे, साडे, मिरगव्हाण, अर्जुननगर, बोरगाव, दिलमेश्वर, करंजे, भालेवाडी, वाघाचीवाडी, शेलगाव, खांबेवाडी या गावांचा समावेश आहे.

पुर्वी सात वेळा भरले धरण ..
२००९-१०, २०१०-११, तब्बल पाच वर्ष धरण कोरडे किंवा पाणी कमी असल्याने रिकामे झाले तर नंतर २०१६-१७, २०१७-१८, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ अशा पद्धतीने सात वेळा धरण भरलेले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE