पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धेत चौदा पैकी सहा गावे पात्र ; आज होणार सन्मान
करमाळा समाचार
आपल्या सोलापूर जिल्ह्यात समृद्ध गाव स्पर्धेत करमाळा तालुक्यातील 14 गावे सहभागी असून पहिल्या टप्प्यात 6 गावे सन्मान पात्र झाली आहेत. या गावांचा सन्मान सोहळा पंचायत समिती व पानी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.


या 6 गावांचा सन्मान सोहळा दि 7 ऑगस्ट 2021 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता पंचायत समिती हॉल ता -करमाळा येथे कोरोना बाबतीत काळजी घेवून 6 गावातील सन्मानास पात्र गावे 1.कोंढेज 2.खडकी 3.घारगाव 4.गोरेवाडी 5.तरटगाव 6शेलगाव.(क) गाव 4 ते 5 निवडक व्यक्ती उपस्थित करण्याचे नियोजन केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषि श्री रवींद्र माने साहेब श्री समीर माने साहेब तहसीलदार करमाळा,सहा.गट विकास अधिकारी श्री राजाराम भोंग साहेब. करमाळा,उमेद अभियान चे तालुका व्यवस्थापक,सभापती उपसभापति तसेच पानी फाउंडेशन प्रमुख मार्गदर्शक श्री.डॉ.अविनाश पोळ सर हे देखील उपस्थित राहणार आहेत.