…तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवारांनी मानले मोदींचे आभार !
करमाळा समाचार
अजितदादा पवार यांच्या बंडानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पक्षप्रमुख ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी पंतप्रधान यांचे सुरुवातीला आभार मानत ईडी कारवाई मुळे अजितदादा पवार यांच्यासह इतर आमदारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कारण सांगितले आहे तर येणाऱ्या काळात लोकात जाऊन दाद मागणार आहोत असेही पवारांनी स्पष्ट केले. तर पक्षाच्या विरोधीपक्षनेते व प्रतोदपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्राकडून काँग्रेससह राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारी पक्ष असल्याने सिंचन व इतर बाबींवरून घोटाळे बाज पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उल्लेख केला होता. पण त्यानंतर बीजेपी ने राष्ट्रवादी च्या आमदारांना मंत्रीपदी दिल्याने त्यांनी केलेले आरोप हे खोटे असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे पवार यांनी सुरुवातीला भाजपाची व पंतप्रधानाचे आभार मानले.

जे घडलं आहे त्याची मला चिंता नाही. लोकांमध्ये जाऊन आपण पाठिंबा मिळवणार असून आमची खरी शक्ती सामान्य माणूस आहे. तटकरे व पटेलांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पक्षातून यापूर्वी जेवढे फुटले त्यांचा पराभव झाला. आता पक्षाचं काय होणार यापेक्षा गेल्या त्यांच्या भविष्याची चिंता करावी लागेल असेही पवार म्हणाले.