करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अजितदादांच्या बंडानंतर अपक्ष आमदार संजयमामांची भुमिका जाहीर

करमाळा समाचार

नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी तीन वर्षातून तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावरून करमाळ्याचे अपक्ष आमदार व अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असलेले आमदार संजय मामा शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून जिथे अजित दादा तिथे आपण असे सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संजयमामांना ही मंत्री पद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अजित दादा यांच्यासोबत आज शपथ घेताना दिसत आहेत. त्यामध्ये पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्याही निकटचे सर्व आमदार या ठिकाणी शपथ घेताना दिसत आहेत. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यासह इतर आमदारांचा समावेश आहे.

करमाळा तालुक्याच्या राजकारणात संजय मामा शिंदे अपक्ष आमदार झाले असते तरी ते पहिल्यापासून अजित दादांना आपला नेता मानतात व त्यांच्यासोबतच कायम राहिले आहेत. मध्यंतरी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमदार संजय मामा यांनी विरोधात मत केल्याचे आरोप केले होते. त्यावर बोलताना उघडपणे संजय मामा यांनी आपण अजितदादा यांच्या सोबत काम करतो बिनबुडाचे आरोप करु नये असे सांगितले होते.

त्यानंतर शिवसेना फुटली पण संजय मामा मात्र कायम अजित दादांसोबत असल्याचे दिसून आले होते. त्यांनी आजही ठामपणे आपण कायम अजितदादांसोबतच असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता अजितदादा यांचे जवळचे असणाऱ्या संजय मामांना मंत्रीपद भेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE