विधवा प्रथा मुक्त महाराष्ट्रासाठी सामाजीक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांचे पुढचे पाऊल
समाचार टीम
आज दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी विधवा प्रथा मुक्त महाराष्ट्र हे बॅनर करमाळातील रिक्षाला लावून उप विभागीय पोलिस अधिकारी डाँ.विशाल हिरे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंंगी महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, पत्रकार विशाल घोलप, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत , सचिव योगेश जगताप , मुख्यकार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे ,खजिनदार सचिन चेंडगे ,राजेंद्र घाडगे आदि उपस्थीत होते.

17 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा शासन निर्णय झाला आहे त्या अनुसंगाने प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून सदर ऊपक्रम हाती घेतला आहे आणि प्रचार व प्रसार करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील शहरात असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाला बॅनर अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल डाॅ.हिरे साहेबांंनी संतोष राऊत यांचे अभिनंदन केले.

असे पध्दतीने बॅनर लावण्याबाबत सातारा. बीड पुणे.मुंबई. धुळे.जळगाव. सोलापूर. रत्नागिरीत स्थानिक संस्थानी पुढाकार घेत असलेचे कळविले आहे मी महाराष्ट्रातील सर्व.नगरपरिषद. नगरपालिका व महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विनंती. करतो की आपण पुढाकार घेऊन विधवा महिला मुक्त महाराष्ट्र असे रिक्षा किंवा इतर वाहनाना बॅनर लावून प्रचार व प्रसार करण्याबाबत सहकार्य करावे असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.
प्रमोद झिंजाडे, मोबाईल नंबर 775903052 राज्य समन्वयक. विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान. महाराष्ट्र राज्य. राजू शिरसाठ. अशोक पिंगळे. कालींदी पाटील.