सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम जाहीर – कार्याध्यक्ष् मुकूंद साळुंके
करमाळा –
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचा दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा”” आदर्श शिक्षक “पुरस्कार कार्यक्रम सांगोला याठिकाणी संपन्न होणार आहे. अशी माहिती राज्याचे नेते शिवाजीराव जमाले सर यांनी दिली.

तरी या आदर्श शिक्षकपुरस्काराठी सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना आवाहन करण्यात येते की, संबंधित तालुक्यातील पदाधिकारी यांच्याकडे आपला प्रस्ताव दि.१३ मार्च २०२२ पर्यंत पाठविण्यात यावा त्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे उपसंचालक माननीय श्री औदुंबर उकिरडे साहेब तसेच लातूर विभागाचे सहसचिव माननीय श्री मारुतीराव फडके साहेब तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर साहेब अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे .
तरी सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपले प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भारत इंगवले, , सचिव सचिन झाडबुके,उपाध्यक्ष संभाजी वागज, नीलकंठ लिंगे ,विजय वाघमोडे, तुकाराम मेटकरी , उत्तम हानपुडे अर्जुन बनसोडे ,सुनील बनसोडे, गणेश यादव, मोहन गायकवाड ,हरिदास जाजनुरे, शिवाजी लोखंडे , विष्णू दगडे रोहिदास साळुंके यशवंत तिवारी व सर्व पदाधिकारी केलेली आहे