करमाळासोलापूर जिल्हा

केत्तुर खुन प्रकरणात वेगात तपास सुरु ; “या” दिशेने तपास सुरु

प्रतिनिधी – करमाळा

शुक्रवारी दुपारी केत्तुर ता. करमाळा येथील जनावरांच्या मागे गेलेला शेतकरी पुन्हा माघारीच आला नाही. त्यामुळे करमाळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबंधिताचा शोध घेण्यात आला. तर ती व्यक्ती गावातीलच स्मशानभूमी शेजारी मृत पडलेली मिळून आली. सदरच्या व्यक्तीच्या डोक्यात कोणीतरी जोरदार घाव केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. नेमके हे प्रकरण कशातून घडले हे मात्र उघडकीस आले नसले तरी पोलीस विविधअंगाने याची चौकशी करीत आहेत. सदरचा प्रकार शनिवारी पहाटे सातच्या सुमारास उघडकीस आला.

शिवाजी सिताराम येडे (वय ४८) रा. केत्तुर ता. करमाळा हे शुक्रवारी दुपारी म्हशी घेऊन शेताकडे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते म्हशी घेऊन माघारी फिरत असत. पण काल शुक्रवारी शिवाजी येडे हे माघारी आलेच नाहीत. परंतु म्हशी मात्र घरी पोहोच झाल्या होत्या. थोड्या उशिरा येतील म्हणून घरच्यांनाही लगेचच शोधाशोध केली नाही. पण रात्र झाली तरीही येडे घरी आलेच नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तर याबाबत पोलिसात ही तक्रार दाखल केली.

politics

यावेळी करमाळा पोलिसांनी पहाटे तपासाला सुरुवात केली. तसेच गावकऱ्यांनी ही परिसरात शोधा शोध सुरू केली होती. यावेळी केतुर ते पोमलवाडी जाणाऱ्या रस्त्याला उजनी धरणाच्या पुलाजवळ स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी शेजारी ते मृतशरीर मिळून आले. परंतु त्या डोक्याला मोठी जखम असतानाही परिसरात कुठेही रक्त सांडलेले दिसून येत नव्हते. त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय येऊ लागला. सदरच्या ठिकाणी रक्त नसल्यामुळे त्या व्यक्तीला दुसरीकडे मारून त्या ठिकाणी आणून टाकल्या बाबत संशय उत्पन्न झाला आहे.

नेमके शिवाजी येडे काल दुपारपासून कुठे गेले होते. कोणासोबत होते ? याचा कोणालाच पत्ता नसल्याने विविध अंगाने या घटनेचा तपास केला जात आहे. गावात कोणाशी दुश्मनी, कोणाचे पैशाची देवाणघेवाण किंवा कोणत्या अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला आहे का याची शहानिशा करून पोलीस तपास करत आहे. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भेट दिली आहे. तर परिसरातील जवळपास आठ ते दहा संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी हे करीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE