राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
करमाळा समाचार
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान च्या वतीने अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण थांबावे, प्रॉव्हिडंट फंडाची खाजगीकरण रद्द करून केवळ सरकारी व सार्वजनिक उद्योगातील गुंतवणूक करण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित ऐवजी विना शब्द काढून कायम अनुदानित करावेत, दि. १३ सप्टेंबर २०१९ महाराष्ट्र शासन निर्णय नुसार अंशतः अनुदानित (२०% अनुदान प्राप्त शाळा) अशा शाळांना १ एप्रिल २०१९ पासून वाढीव टप्प्याचे थकीत अनुदान त्वरित अदा करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी करमाळा यांना देण्यात आले.
यावेळी प्रोटान सोलापूर जिल्हा सचिव विश्वनाथ सुरवसे, नागनाथ हेळकर, बहुजन क्रांती मोर्चा करमाळा संयोजक आर आर पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे करमाळा तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तालुका कार्याध्यक्ष कयूम शेख, सचिव जावेद मनेरी, बहुजन मुक्ती पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश दळवी, शहराध्यक्ष भीमराव कांबळे, राष्ट्रीय घुमंतू जनजाति मोर्चाचे सोलापूर जिल्हा संयोजक दिनेश माने, जिल्हा प्रभारी गौतम खरात आदीजण उपस्थित होते.