जिल्ह्यात आज ठिकठिकाणी रस्ता रोको ; करमाळ्यात अकरा वाजता
करमाळा समाचार
शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू होते. मात्र त्याठिकाणी आंदोलकांवर अतिशय अमानुषपणे लाठीमार केला गेला. या घटनेचा निषेध व न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज सकाळी आकरा वाजता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. तर रविवारी रस्तारोको व बुधवारी निषेध मोर्चाचे आयोजन केले असल्याचे सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडुन सांगण्यात आले आहे.

आज पर्यत लाखोंच्या जमावासोबत ५८ मोर्चे निघाले. एकाही पोलिसाला साधी काठीही सोबत ठेवण्याची गरज पडली नाही. आज अचानक कोणाच्या सांगण्यावरून या मराठा आंदोलकांवर इतक्या अमानुषपणे लाठीमार झाला आहे. याची सर्व चौकशी व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा करमाळा व सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने केली आहे.

सकाळी आकरा वाजता दोनशे ते तीनशे मराठा बांधव तहसिल कचेरी परिसरात जमा झाले होते. सरकार विरोधी घोषणा देत सदरचे निवेदन तहसिलदार यांच्याकडे देण्यात आले. सुरवातीला केवळ निषेध मोर्चाचे नियोजन केले होते नंतर सोलापूर हुन आलेल्या सुचनेनंतर रस्ता रोकोचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी आकरा वाजता देवीचामाळ रस्ता बाह्यवळण रस्त्यावर सदरचे आंदोलन केले जाणार आहे.