संघटनेच्या नावाचा कुणी गैरवापर केला तर कठोर कारवाई करावी
प्रतिनिधी- करमाळा
गेल्या अनेक वर्षांपासुन करमाळा तालुक्यासह महाराष्ट्रभर माझी जनशक्ती संघटना शेतकरी
हितासाठी काम करीत आहे. परंतु माझ्या किंवा संघटनेच्या नावाचा वापर करुन
जर कोणी पैशाची मागणी करत असेल किंवा त्रास देत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे पत्र जनशक्तीच्या संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी करमाळा शहर व तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाला आणि कार्यालयाला दिले आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासुन करमाळा तालुक्यात शेतकरी हितासाठी अनेक आंदोलने केली. विजेच्या संदर्भात, ऊसाच्या संदर्भात, रस्त्याच्या संदर्भात तसेच महसुलच्या संदर्भातील आंदोलने केली. या आंदोलनांतुन सर्व सामान्यांना न्याय आणि हक्क देण्यासाठी झगडलो. तसेच वेळप्रसंगी अधिका-याची बाजु घेऊन पोलिस कर्मचा-यांना घरे मिळावीत, बोनस मिळावा यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केले. एस. टी. कर्मचा-यांना शासकीय सेवेत रुजु करुन घेण्यासाठी आंदोलने केली.

तसेच उजनीचे पाणी वाचावे म्हणुन आंदोलन केले. अशा अनेक आंदोलनातुन शासनातील अधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांचा समन्वय साधुन न्याय देणेचा प्रयत्न केला. यामुळे प्रत्येक गावात कार्यकर्ते तयार झाले. परंतु कोणी कार्यकर्ता संघटनेचे नाव वापरुन, माझे नाव वापरुन जर प्रामाणिक कर्मचा-यांना पैशासाठी छळत असल्यास ताबडतोब संघटनेला संपर्क साधावा आणि कायद्याप्रमाणे कुठलाही विचार न करता त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.
संघटना कायद्याच्या बाजुने आणि अधिका-याच्या बाजुने उभी राहील. जर कोणी कार्यकर्ता अवैध धंदा करीत असेल तर तेथे संघटनेचा कोणताही संबंध नाही. भारतीय संविधानाप्रमाणे कायद्याला माननारे, कायद्याचा आदर करणारी शेतकरी संघटना असुन सर्वसामन्यांची पुढेही प्रामाणिकपणे काम करील असे आश्वासन अतुल खूपसे पाटील यांनी या पत्रात दिले आहे.