करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अवैध वाळु वाहतुक दोघांवर गुन्हा दाखल ; ट्रॅक्टरसह वाळु जप्त

करमाळा समाचार

आवाटी तालुका करमाळा येथील सिना नदी पात्रात विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करत असताना एक ट्रॅलीसह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई करमाळा पोलीस यांच्याकडून करण्यात आली. सदरची कारवाई २१ सप्टेंबर मध्यरात्री अडीच वाजता करण्यात आले आहे.

सोहेल मुनेर पठाण व ताहेर जाफर खान दोघेही रा. आवटी तालुका करमाळा यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडे एक ब्रास वाळू मिळून आली. याप्रकरणी करमाळा पोलीस गणेश खोटे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या माहितीच्या आधारावर करमाळा पोलीस हवालदार अजित उबाळे, तौफिक काझी, गणेश शिंदे व गणेश खोटे यांचे पथक आवटीच्या दिशेने गेले. यावेळी महादेव मंदिराच्या पाठीमागे थांबलेले असताना समोरून विना नंबरचा एक ट्रॅक्टर येत असल्याचा दिसले. त्याला थांबवला व माहिती घेतली असता पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीमध्ये वाळू दिसून आली.

वाळू बाबत माहिती घेतली असता विनापरवाना सदरची वाळू घेऊन जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सोहेल पठाण (वय २३) या चालकाला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने मालकाचे नाव सांगितले. तरी दहा लाख रुपयाचा महिंद्रा ट्रॅक्टर व ट्रॉली व एक ब्रास वाळू अंदाजे दहा हजार रुपये रकमेची असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE