केळी निर्यात फसवणूक प्रकरणातील रक्कम परत मिळवून देण्यात यश; अंजना कृष्णा यांची भुमिका महत्वपूर्ण
करमाळा

केळी निर्यात व्यवहारात झालेल्या फसवणूक प्रकरणात सोलापूर जिल्हा पोलिसांनी तत्पर कारवाई करत पीडित व्यक्तीची रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात धाडसी व प्रभावी कामगिरी करत IPS अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

करमाळा तालुक्यातील माजी नगरसेवक व आमदार नामदेवराव जगताप यांचे सुपुत्र राहुल नामदेवराव जगताप यांची केळी निर्यात व्यवहारात काही आरोपींकडून फसवणूक झाली होती. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर IPS अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात तपास अधिकारी (IO) पाखरे तसेच बंडगर साहेब यांनीही महत्त्वपूर्ण योगदान देत तपास प्रभावीपणे पुढे नेला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपींकडून फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात यश आले.

या प्रकरणात न्याय मिळाल्याबद्दल राहुल नामदेवराव जगताप व बाजार समीतीची माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा मॅडम तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. “मॅडम यांच्या धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळेच आम्हाला न्याय मिळाला. त्या खऱ्या अर्थाने ‘लेडी सिंघम’ आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अशा कर्तव्यदक्ष व निडर अधिकारी कार्यरत असणे ही नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

