सुरज शिंदेच्या दमदार खेळीने महाराष्ट्र संघाला सावरले ; पण शिंदेचे एका धावेने हुकले शतक
करमाळा समाचार
बीसीसीआय अंतर्गत सुरू असलेल्या सी के नायडू (c.k.nayadu) चषकात करमाळा तालुक्यातील सुरज शिंदे (१०७ चेंडुत ९९) (suraj shinde) यांनी चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला सावरले आहे. केवळ एका धावेने त्याचे शतक हुकल्याने निराशा जरी झाली असली तरी संघाला मात्र अडचणीच्या काळात सुस्थितीत नेऊन ठेवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे.

सीपी ग्राउंड मुलापडू येथे सुरू असलेल्या सी के नायडू चषकाततील महाराष्ट्र विरुद्ध चंदीगड (chandigad) असा सामना सुरू आहे. सुरुवातीला चंदिगड संघाने फलंदाजी करताना 138.4 षटकात 429 पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर महाराष्ट्र संघाला फलंदाजीसाठी यावे लागले.

एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. 20 धावांवर दोन तर 51 धावांवर तिसरी विकेट पडल्याने संघ अडचणीत आलेला होताच. शिवाय 107 धावांवर चौथा तर 145 धावांवर 5 गडी बाद झाल्याने महाराष्ट्र (maharashtra) संघाच्या अडचणीत वाढ झाल्या होत्या. पण यश क्षीरसागर(yash kshirasagar) (150चेंडुत 83 ) हा एकाकी झुंज देत होता.
महाराष्ट्र संघाचे पाच फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात आपली झंझावती खेळी दाखवण्यासाठी उतरला तो सूरज कैलास शिंदे, सुरजने 107 चेंडूंचा सामना करत 99 धावा जमवल्या त्यात 9 चौकार व 4 षटकारांचा समावेश आहे. एक फलंदाज बाद झाल्या नंतर मैदानात आलेल्या यश क्षीरसागर सोबत भागीदारीत 105 धावांची खेळी करीत महाराष्ट्र संघाला सावरले. त्यामुळे अडचणीत सापडलेला महाराष्ट्र संघ बाहेर पडण्यात मदत झाली.
कोरोना काळात सर्व प्रकारचे खेळ बंद होते. शिवाय सरावाला ही संधी मिळत नव्हती अशा काळातही सुरज शिंदे व इतर खेळाडूंनी आपला सराव सुरू ठेवला होता. त्याचे फळ आता मिळताना दिसून येत आहे. आता सुरू असलेल्या सामन्यांमध्ये आजचा चौथा दिवस शेवटचा दिवस असून या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून मोठ्याप्रमाणावर अपेक्षा आहेत.
सुरुवातीला खेळताना चंदीगड संघाने सर्व गड्यांच्या मोबदल्यात 429 धावा जमवल्या आहेत. तर महाराष्ट्र संघाला सुरज शिंदे व यश क्षीरसागर यांच्या खेळीनंतर ही केवळ 332 धावा जमवता आल्या. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर 97 धावांची आघाडी ही चंदीगड सांगायला मिळाली होती. पण दुसऱ्या फेरीत चंदिगड संघाची दाणादाण उडवली 24 व्या षटकापर्यंत 41 धावांवर सात फलंदाज बाद झाले आहेत. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र संघाला विजय मिळवण्याची चांगली संधी आहे. आजच्या शेवटच्या दिवसा कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.