शिक्षक पतसंस्थेची सभा उत्साहात संपन्न व कर्जमार्यादा 21 लाखापर्यतची घोषणा
करमाळा –
कमलाभवानी प्राथ. शिक्षक पतसंस्थेची सभा उत्साहात संपन्न व 1 ऑक्टो 24 पासून कर्जमार्यादा 21 लाख रु होणार असल्याची माहीती चेअरमन विनोद वारे यांनी दिली. कमलाभवानी प्राथ शिक्षक पतसंस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा सोसायटी सभागृह करमाळा येथे चेअरमन विनोद वारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

या सभेसाठी संस्थापक बाळासो गोरे, जिल्हा सोसायटी संचालक उमेश पाटील, हनुमंत सरडे, विलास शिराळ तसेच कमलाभवानी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन मधुकर शिंदे, सचिव सुनील कदम, पतसंस्थेचे संचालक अमृत सोनवणे, संजय वाघमारे, राजकुमार खाडे, तात्यासाहेब जगताप, संतोष कुंभार, लक्ष्मण भंडारे, श्रीम विद्या जाधव-कदम, सौ मीराबाई जाधवर उपस्थित होते.

यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 5 वी,8 वी, शिष्यवृत्ती व नवोदय प्राप्त सभासद पाल्य तसेच MBBS, BAMS, NIT व PHD प्रवेशित सभासद पाल्यांचा तसेच SSC व HSC मध्ये प्रथम 3 सभासद पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून, जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री अनिल यादव व श्रीम सुवर्णा जाधव यांचा शिक्षक रत्न तर, उमरड, गोयेगाव, खातगाव 2, घोटी व शेरेवस्ती या शाळांचा तालुकास्तरीय आदर्श शाळा म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव सुनील कदम, विषय वाचन विनोद वारे ,आभार तात्यासाहेब जगताप, स्टेज मोनिटरिंग अमुत सोनवणे व संतोष कुंभार यांनी तर सुत्रसंचालन संचालक राजकुमार खाडे यांनी केले.