पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत आठ वर्षापासून फरार दरोड्यातील आरोपीला बेड्या
करमाळा समाचाऱ
करमाळा तालुक्यातील कृष्णाजी नगर भागात 2013 साली जबरी दरोडा टाकून एक लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्या प्रकरणी पाच दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक आजपर्यंत फरार होता त्याला करमाळा पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे.

येथील महावीर सुंदेचामुथा यांच्या घरी 2013 साली दरोडा टाकून फरार झाले होते. त्यावेळी पोलिसांनी तपास वेगात करून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. परंतु एक मिळून आला नव्हता.
त्याला करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष देवकर, पो. कॉ. चंद्रकांत ढवळे, पो. कॉ. तौफिक काझी यांनी सापळा रचून पकडले आहे. नंदया सुल्या पवार वय ३२ रा. जवळा ता. जामखेड असे आरोपीचे नाव आहे.
