करमाळ्यात ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न ; मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

उमरड(नंदकिशोर वलटे)


करमाळा येथे कार्यरत असणारे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचा दुसरा वर्धापन दिन सोहळा विकी मंगल कार्यालय करमाळा येथे उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात पाच विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉपी, प्रमाणपत्र व रोख रक्कम अनुक्रमे पाच, तीन, दोन व एक हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात केंद्रीय अधिकारी पांडुरंग चोरमले व प्रमुख वक्ते मनोज वाबळे यांच्यासह करमाळा भाजपचे अध्यक्ष गणेशभाऊ चिवटे, मनसेचे अध्यक्ष संजयबापू घोलप, जेष्ठ नेते वामनराव बदे, करमाळा नगरपालिका सदस्य अतुल फंड, भाजप शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, आशपाक जमादार, संजय साखरे, यशपाल कांबळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,प्रा. लक्ष्मण राख,डॉ.पवार,पत्रकार विशाल घोलप, पांडुरंग वायकर पाटील सर, तांबोळी सर तसेच उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत या इन्स्टिट्यूटचे मालक प्रा.महेश निकत सर यांनी केले व प्रास्ताविक मा. तांबोळी सर यांनी केले. या कार्यक्रमात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना परीक्षा घेऊन ग्लोबल टॅलेंट म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रमुख वक्ते मनोज वाबळे यांनी विध्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले व स्वतःला ओळखण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास ग्रामीण भागातील अनेक शाळांचे शिक्षक विध्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकिशोर वलटे यांनी केले तर आभार प्रा. सय्यद मॅडम यांनी मानले.

यावेळी
प्रथम क्रमांक:- श्रावणी दिलीप राऊत (साडे हायस्कूल साडे)
द्वितीय क्रमांक:- कपिल किसन कांबळे करमाळा,
तृतीय क्रमांक:-संजीवनी सुंदरदास शिंदे, वीट
चतुर्थ क्रमांक :-रोहित शशिकांत पवार, करमाळा
पाचवा क्रमांक:- रुद्राक्ष अभिजीत गायकवाड, करमाळा

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!