वातावरण तापले- आदिनाथ कारखान्यावर विरोधक गोळा व्हायला सुरुवात
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आणि त्या दिवशी ऐनवेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अर्धवट शेअर रकमेवरून बागल गटाने आक्षेप घेत विरोधी उमेदवारावर हरकती घेतल्या होत्या. त्यानंतर उमेदवाराची धावपळ सुरू झाली व त्यांनी थेट आदिनाथ कारखाना गाठला पण यावेळी कारखान्यावर एकही कर्मचारी उपस्थित नसल्याबाबत विरोधी गटातील कार्यकर्त्यांनी आरोप केले होते. तर त्या संदर्भात त्या परिसरातील विडिओ समाजमाध्यमात प्रसिद्ध करण्यात आले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर काल सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्या सुनावणीत निकाल अद्याप दिलेला नसला तरी जवळपास 36 उमेदवारचा निर्णय हा या सुनावणीच्या निकालावर अवलंबून आहे. आजिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अपूर्ण शेअर्स भरण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी कर्मचारी मिळवून आले नाहीत. याचा राग सध्या सर्व उमेदवारांमध्ये दिसून येत आहे.

यावरून आदिनाथ प्रशासन हे बागल यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे तक्रारी करण्यात आले होते. त्याच कारणातून आज जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले या समर्थकांसह आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे. तर प्राध्यापक झोळ हेही समर्थकांसह कारखान्यावर जातील अशी माहिती मिळत आहे.
बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी उमेदवार व समर्थक गोळा होण्याचे सुरू आहे. याठिकाणी थोड्याच वेळात प्राध्यापक रामदास झोळ व सवितादेवी राजेभोसले हे पोहचत आहेत. यावेळी इतर विषयासह थकबाकी नसल्याबाबत पत्र द्या असाही मुद्दा घेतील अशी शक्यता आहे. या ठिकाणी सर्वांच्या वतीने प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. नेमकी भुमीका काय आहे हे त्या ठिकाणी समजणार आहे. सध्यातरी कार्यकर्ते गोळा होण्याचे काम सुरु आहे.
तर कालच्या विषयावर कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ते काल १०:३० पर्यत होते कामानिमित्त बाहेर गेले होते तर कर्मचारी उपस्थित होते अशी माहीती त्यांनी दिली.