एस टी ची व्यथा चव्हाट्यावर आल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग ; करमाळा आगारात ४ गाड्यासह कर्मचारी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात समाज माध्यमांमध्ये करमाळा आगार चर्चेत आल्यानंतर आता संबंधित विभागाने त्याची दखल घेतली आहे. करमाळा तालुक्यातसाठी दोन टप्प्यांमध्ये लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या चार गाड्या सह दहा कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. तरीही आगाराला अजूनही पंधरा गाड्यांची गरज असल्याचे दिसून येते. संख्येने जरी कमी असले तरी गाड्या आल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

करमाळा येथील आगार व्यवस्थापकाकडे वारंवार मागणी करूनही चांगल्या गाड्या करमाळ्यासाठी मिळत नव्हत्या. यासाठी तालुक्यातून मोठा उठाव समाज माध्यमाच्या माध्यमातून झाला होता. प्रत्येक जण सोशल मीडियामध्ये या संदर्भात माहिती टाकून कशा पद्धतीने बस यामध्येच बंद पडतात या संदर्भात माहिती पुढे फॉरवर्ड करत होते. नुकताच एका बसने मोबाईल बॅटरीच्या साह्याने प्रवास करीत असलेला व्हिडिओ तब्बल वीस लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला व करमाळा पुन्हा एकदा चर्चेत आला.

या मागणीसाठी तालुक्यातील वेगवेगळ्या नेत्यांनीही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले होते. परंतु अपेक्षित यश आलेले अजूनही दिसून येत नाही. केवळ चार गाड्या व काही कर्मचारी मिळाले मात्र अजूनही १५ गाड्यांची करमाळा येथे गरज असल्याचे दिसून येते. तर लांब पल्ला जाण्यासाठी त्या गाड्या उपयोगात येऊ शकतात. त्यामुळे वाहक चालकासह गाड्या वाढवून मिळाल्या तर करमाळा आगाराला फायदा होऊ शकतो.
करमाळा आगारासाठी चार गाड्या मिळालेल्या आहेत. तर दहा कर्मचारी करमाळ्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. गाड्या पोहोच झाल्या पण कर्मचारी अद्याप मिळालेले नाहीत. तरी यामुळे लांब पल्ल्याच्या मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. तर करमाळा आगाराला आणखीन तीन ते चार गाड्या येणे अपेक्षित आहे.
– विरेंद्र होनराव, आगार व्यवस्थापक करमाळा.