करमाळासोलापूर जिल्हा

नागरीकात संताप – बिबट्या अजुनही करमाळ्यातील त्याच परिसरात ; रात्री भिवरवाडी येथे हल्ला

करमाळा समाचार 

बिबट्याने दोन दिवसांपासून हल्ला केलेला नसल्याने किंवा रविवारच्या दिवशी दिवसभरात बिबट्या आढळून न आल्याने बिबट्या करमाळा तालुक्यात आहे का निघून गेला याबाबत संभ्रम तयार झाला होता. तसेच माढा परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे मिळून आले होते. त्यामुळे करमाळ्यातील बिबट्या हा माढ्याच्या दिशेने गेला का असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. पण त्यावर पुन्हा एकदा पूर्णविराम लागला असून त्याने भिवरवाडी येथे गायीवर व वासरा वर हल्ला केला आहे. त्यामुळे बिबट्या अजूनही त्याच परिसरात असल्याची शक्यता आहे.

रविवारी ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्री ने आहे असे लोक सांगत असताना ही वन विभाग व संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले . आणखी एखाद्या नागरिकाचा बळी घेतल्यावर वनविभाग व इतर यंत्रणा जागी होणार का ? असाही प्रश्न लोक विचारु लागले आहेत. बिबट्याच्या शोध घ्यायला व त्याला ठार मारणे वनविभागाला शक्य नाही का ? त्यांना त्याला मारायचे नाही असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला आहे.

मागील अनेक दिवसापासून कोरोना नंतर बिबट्याच्या भितीने लोकांच्या व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनातुन सावरण्याआधी बिबट्यामुळे अडकले आहेत. वनविभाग यातुन कधी बाहेर काढेल याचीच प्रतिक्षा नागरीक करीत आहेत. पण विभाग पार्ट टाईम जॉब केल्यासारखे वागत आहे. तो जंगली प्राणी आहे २४ तासात कधीही कुठेही हल्ला किंवा बाहेर निघु शकतो तर मग त्याला पकडण्यासाठी रात्रीची यंत्रणा का तयार केली जात नाही.

तरी ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. किंवा जिथे बिबट्या ताब्यात घेतला आहे. तिथुन वनविभागाचे काम पाहण्यासाठी नागरीकांनी लांब रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर बिबट्यावर गोळीबार केल्यास परिसरातील नागरीकाला गोळी लागण्याची शक्यता असल्याने लांबच राहण्याचे व वनविभागाला मोकळीक देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज भिवरवाडी परिसरात झालेला हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला याबाबत शोध सुरु आहे. पण झालेल्या हल्ल्यात पाठिमागील बाजुस हल्ला झाला आहे आणी ती पद्धत बिबट्याची नसल्याचेही सांगितले जाते पण सध्या बिबट्या उपाशी असल्याने हल्ला करुन नंतरही मागील मांस खाल्ल्याले असु शकते. किंवा तो हल्ला दुसऱ्याच प्राण्यांर केलाय याची तपासणी सुरु आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE