जागतिक कन्या दिनाच मुलीकडून बापाला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट , कु मुक्ताई चिवटे हिचा परदेशात डंका
करमाळा समाचार
करमाळा येथील मंगेश चिवटे यांच्या कन्येने परदेशात डंका वाजवला आहे. कु.मुक्ताई हिने एन्ड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप यांनी थायलंड येथे आयोजित केलेल्या स्केटिंग स्पर्धेत यश मिळवत ३ गोल्ड मेडल जिंकले आहेत. या यशामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे मंगेश चिवटे आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करत असताना त्यांच्या मुलींने केलेल्या कामगिरीमुळे बापालाच कन्या दिनाच गिफ्ट मिळाल्याचे दिसत आहे.

एन्ड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप यांनी थायलंड येथे २० ते २२ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या आहेत. या स्केटिंग स्पर्धेमध्ये कु मुक्ताईने तब्बल ३ गोल्ड मेडल मिळवले आहेत . मुक्ताईने 5 min Race, 2 min Race आणि 20 sec Race या तीनही प्रकारात कु. मुक्ताईची सुवर्ण कामगिरी केली आहे.
