करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

सागर कांबळे वापरत असलेल्या दुचाकी सोबत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

करमाळा समाचार 

पुणे परिसरात एका दुचाकीसह एक मृत शरीर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. ते शरीर सागर कांबळे यांचे असल्याचे बोलले जात आहे. अद्याप याबाबत अधिकृत जाहीर करण्यात आले नाही.

करमाळा तालुक्यात अर्ध्या किमतीचे आमिष दाखवून लोकांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांना हवा असलेला सागर कांबळे परवा दिवशी फेसबुक वर ऑनलाईन आला होता व हात जोडलेले सिम्बॉल टाकून पुन्हा हा दिसून आला नाही. तर पुणे परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका तरुणाचे मृत शरीर आढळून आले आहे. त्याशेजारी सागर वापरत असलेली दुचाकी असल्याने ते मृत शरीर सागर चेच असल्याचे बोलले जात आहे. तर सागर ने अखेरचे फेसबुक वर येत लोकांची माफी मागून जगाचा निरोप घेतल्याचेही बोलले जात आहे. लाखो रुपयांचा अपहार करून जर सागर सारख्या व्यक्तीला आत्महत्या करावी लागत असेल तर त्यांचीही फसवणूक झाली असेल असे असे अनेक प्रश्न मागे शिल्लक राहत आहेत.

सागरचे निकटवर्तीय पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. सदर मृत शरीर हे कोणाचे आहे याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरीही मिळालेल्या माहितीनुसार ते मृत शरीर सागर चेच असल्याचे बोलले जात आहे. जर तसे असेल तर करमाळावासियांसाठी हा मोठा धक्का असेल. यातून नेमके काय घडले हे सागर शिवाय कोणालाही माहीत नाही. त्यामुळे नेमकी फसवणूक सागर ने केली का सागरची फसवणूक झाली हे तपासून काढणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहीती घेऊन लवकरच खुलासा केला जाईल. अद्यापतरी तो सागरच आहे का नाही याचा तपास घेणे सुरु आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE