करमाळा तालुक्यातील छोट्याशा गावातील कन्येचे दैदीप्यमान यश ; अत्यंत कठीण परिक्षेत मिळवले 99.23 पर्सनटाईल
समाचार टीम
17 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या NEET या देशपातळीवरील राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा निकाल दि.07/09/2022 रोजी NTA कडून जाहीर करण्यात आला. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील कन्या प्राजक्ता आश्रुबा गोयकर हिने 618 गुण ( 99.23 पर्सनटाईल ) मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

17 जुलै 2022 रोजी संपूर्ण भारतासह जगभरातील इतर 13 देशांमधील एकूण 1872563 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

भारतातील परीक्षा सेंटर व्यतिरिक्त बाहेर देशातील अबुधाबी, दुबई, शारजाह, कोलंबो, सिंगापूर, बँकॉक, काठमांडू, दोहा, कुवेत इ.14 शहरांमध्ये या परीक्षेचे Exam सेंटर होते
प्राजक्ताने इ 1 ली 4 थी कै. साधनाबाई जगताप न प मुलींची शाळा नं 1, 5 वी ते 10 वी क आ ज विद्यालय करमाळा, 11 वी 12 वी महात्मा गांधी विद्यालय करमाळा, Neet परीक्षेसाठी P V संकल्प अकॅडमी लातूर येथील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
तिच्या या यशात तिचे स्वतःचे प्रचंड कष्ट, आईवडील, आजीआजोबा, आतापर्यंतचे सर्व शिक्षक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व आपल्या सर्वांचे आशीर्वाद या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. MBBS चे शिक्षण पूर्ण करून पुढे MD करण्याची तिची इच्छा आहे.