मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा . मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे..
करमाळा प्रतिनिधी सुनील भोसले
मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मराठा आरक्षणा बाबत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा व मराठा आरक्षण वाचवण्याची जबाबदारी जेवढी राज्य सरकारची आहे तेवढेच केंद्र सरकारची पण आहे.
त्यासाठी आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष घालण्यासाठी विनंती करण्यात यावी यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आश्र्वासन दिले केंद्र सरकार योग्य निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढणार असे आश्वासन मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांना दिले.
