करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

संभाजी बीडी विरोधात करमाळ्यात शिवधर्मच्या वतीने उपोषण

प्रतिनिधी – सुनिल भोसले 

संभाजी बिडी या बिडी उत्पादनाचे नावं बदलणे बाबत. तसेच संबंधित कंपनी मालका वरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्या बाबत तसेच THE EMBLEMS AND NAMES (PREVENTATION OF IMPROPER USE) ACT, 1950 मध्ये छत्रपती संभाजी महाराज व इतर सत्यशोधक महापुरुषांचे नाव समाविष्ट करणे बाबत दि-4/9/2020 रोजी ता. करमाळा येथे तहसील कार्यालय पारिसरात एक दिवसीय उपोषण करत शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

उपरोक्त विषयास व संदर्भात अनुसरून आपणास तक्रारी निवेदन देतो की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष आहेत. त्यांची ख्याती जगविख्यात आहे. संभाजी महाराज हे फक्त योद्धेचं नाही तर महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहेत तसेच एक उत्कृष्ट लेखक देखील होते. अशा प्रेरणादायी कारकीर्दच्या महामानवाचे धूम्रपान करण्याचे एक साधन असलेली बिडी यास नाव देऊन साबळे वाघिरे आणि कंपनीचे मालक हे महाशय तमाम महाराष्ट्रातील युवकांना आकर्षित करून आपला व्यवसाय वाढवीत आहे परंतु या महाशयांनी महाराष्ट्रातील बहुजनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम बहुजनाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

तरी आपण संभाजी महाराजांचे नाव वापरून धूम्रपान करण्याचे साधन बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकावरती योग्यती कायदेशीर कार्यवाही करावी या आशयाचे निवेदन दि.7/8/2020 रोजी दिले होते. परंतु आपण यावरती कोणतीही कार्यवाही केली नसल्या कारणाने तसेच..THE EMBLEMS AND NAMES (PREVENTATION OF IMPROPER USE) ACT, 1950 मध्ये छत्रपती संभाजी महाराज व इतर सत्यशोधक महापुरुषांचे नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी आम्ही शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने ता.करमाळा जि.सोलापूर येथे दि 4 / 9/2020 रोजी एक दिवसीय लक्षणीक उपोषण करण्यात आले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE