उजनीच्या पाण्यात बोटीतुन फिरण्याचा जीवघेणा मोह ; बोट पलटल्याने अकलुजच्या पितापुत्राचा पाण्यात बुडुन मृत्यु
करमाळा समाचार
अकलूजहुन करमाळा तालुक्यात आलेले दाम्पत्याचा बोटीत फिरण्याची इच्छा अंतिम इच्छा ठरली असून बोट पलटी होऊन पती व मुलाचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी व इतरांना बुडण्यापासून वाचण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली आहे.

अकलूज येथील दाम्पत्य खाजगी कार्यक्रमासाठी वांगी तालुका करमाळा येथे आले होते पाण्यातून फिरुन येण्यासाठी मासेमारी करणाऱ्या बोटीमध्ये चार ते पाच जण बसून गेले यावेळी बोट पलटी होऊन अपघात झाला या अपघातात विलास शेंडगे व त्यांचा मुलगा जय हा मयत झाला असून इतरांना पाण्यातून काढण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे.

वांगी परिसरात उजनी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असून त्या ठिकाणी पर्यटकांची ये-जा ही सुरू झाली आहे. विविध ठिकाणे पाहण्यासारखेही आहेत तर पाण्यातून प्रवास करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. पण त्याठिकाणी उपयुक्त व गरजेच्या सुविधा नसल्याने अनेकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय अशा पद्धतीने पाण्यातून प्रवास करणे जीवघेणा ठरू शकतो इतरांनी यातून शिकणे गरजेचे आहे.