बाधीतांच्या कुटुंबीयांनी सामाजीक अंतर पाळावे ; नव्याने तालुक्यात 41 बाधीतांची वाढ
करमाळा समाचार –
करमाळा तालुक्यात आज एकूण 187 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागातून 85 तर शहरी भागात 102 टेस्टमध्ये एकूण 41 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात 23 तर शहरी भागात 18 आढळले आहेत. आज एकूण 30 जण घरी सोडल्यानंतर घरी सोडलेल्या यांची संख्या 529 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर एकुण 856 पैकी 314 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ज्यांच्या घरी बाधीत रुग्ण आढळत आहेत. त्या घरात इतरांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले तरी संबंधित लोकांनी स्वतःहुन दुकाने उघडु नयेत तर सामाजीक अंतर ठेवावे.

ग्रामीण परिसर
गुरसडी- 3
वीट – 1
वाशिंबे – 2
जेऊर – 4
देवीचामाळ- 2
शेलगाव (वां)- 8
पोथरे – 2
उमरड-1

शहर परिसर –
शाहूनगर- 3
साठेनगर – 2
किल्ला वेस -1
राशिन पेठ- 2
सिद्धार्थनगर- 2
हिरडे प्लॉट- 2
स्टेट बँक- 1
बागवान नगर-1
कृष्णाजी नगर -2
मुथा नगर- 2