पाच दिवसांच्या आठवड्यावर शासनाने पुर्नविचार करावा – धर्मवीर प्रतिष्ठानची मागणी
करमाळा समाचार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसायांना खीळ बसली आहे. याच्यातून बाहेर निघण्यासाठी सर्वांनाच दुपटीने काम करावे लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या आठवड्यावर ही शासनाने पुर्नविचार करावा व पुन्हा एकदा फक्त रविवार सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करावी अशी मागणी धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहीती अध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे.


ग्रामीण भागातून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आठवड्यातून पाच दिवस काम तर शनिवार, रविवार सुट्टी करण्यासंबंधी शासनाने घेतलेला निर्णय त्यांच्या पद्धतीने बरोबर जरी असला तरी ती परिस्थिती कोरोना महामारी व लॉकडाऊन पूर्वीची होती. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. तर उद्योगधंदे व व्यवसाय अधोगतीकडे वळाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात सह शहरी भागातही शनिवार व रविवार सलग सुट्टी असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाशिवाय इतर उद्योग धंद्यावर याचा परिणाम पडताना दिसत आहे.
शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, व्यवसाईक किंवा खाजगी कंपनीतही कर्मचारी व सामान्य माणुसच काम करत असतो. विशेष म्हणजे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यासारख्या सवलती व सुविधाही मिळत नाहीत. तर पाच दिवसाच्या आठवल्यामुळे या सर्वच लोकांवरही ही ताण पडत आहे. कर्ज प्रकरणे लोकांची देणे यासाठी या पाच दिवसांमध्ये काम आटपून शनिवार व रविवार गर्दी कमी तसेच सरकारी कार्यालये बंद असल्याने यांच्याही कामकाजात अडथळा होत आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवर फक्त शासकीय कार्यालय बंद न राहता संपूर्ण महाराष्ट्रावर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तरी याबाबत पुनर्विचार करून पुन्हा एकदा रविवार एकमेव सुट्टी करण्यात यावी.