ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये झाली भव्य “ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा 2021”
कोर्टी प्रतिनिधी
करमाळ्यातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट तर्फे भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली असून या परीक्षेसाठी प्रथम पूर्व परीक्षा तालुक्यातील पंचवीस ते तीस हायस्कूलमध्ये मागील आठवड्यात घेण्यात आली होती. त्यातून काही हुशार विद्यार्थ्यांची निवड करून मुख्य परीक्षा ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा येथे घेण्यात आली.

या परिक्षेला जवळजवळ २५० विद्यार्थांनी सहभाग नोंदवून ही परीक्षा दिली यातून प्रथम पाच नंबर ला बक्षीस ट्रॉफी, व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरची परीक्षा करमाळा मध्ये प्रथमच खुप दिवसातून घेण्यात आल्यामुळे पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना श्री महेश निकत सर यांनी पुढील करिअर साठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.