Uncategorizedमाढासोलापूर जिल्हा

सोलापूर प्रहार कडून माढा तालुक्यातील रुई गावात झालेल्या जळीत कांडातील जाधव कुटुंबाला मदत..

करमाळा संजय साखरे 

महाराष्ट्र राज्य मंत्री लोकनायक बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्यातील रुई गावात गेल्या चार-पाच दिवसापूर्वी झालेल्या समाजकंटकांनी केलेल्या जळीत कांडामुळे अंबादास जाधव यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. पाच जुलै रोजी बच्चुभाऊ यांनी वाढदिवसानिमित्त ज्या कुटुंबाला छत नाही ज्याच्या डोक्यावर छप्पर काही कारणाने उध्वस्त झाले आहे अशा लोकांना पत्रे देऊन घर उभा करण्यासाठी मदत माझा वाढदिवस साजरा करण्याचे सर्वांना सूचित केले होते. त्याच अनुषंगाने आज सोलापूर जिल्हा प्रहारच्या टीम कडून या कुटुंबाच्या मदतीसाठी यांना घर बांधून ठेवून देण्यासाठी पुढाकार घेत कोटींचे पत्रे आणि जे साहित्य लागते ते पोहोच करण्यात आले.

यावेळी बोलताना सांगितले की लोक नायक बच्चुभाऊ कडू हे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे कैवारी असून ज्या कुटुंबावर अन्याय होतो. त्या कुटुंबापर्यंत प्रहार संघटना जिथे अन्याय तिथे प्रहार या तत्वाने पोहोचते आणि आज बच्चु भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सूचित केल्याप्रमाणे या जाधव कुटुंबांना आम्ही घर बांधण्यासाठी मदत करत आहोत आणि यापुढे जर या कुटुंबावर अन्याय झाला तर प्रहार संघटना हे सहन करणार नाही.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या कुटुंबाची मदत करत असताना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खऱ्या अर्थाने बच्चु भाऊ यांना वाढदिवसाची भेट आम्ही देत आहोत.

यावेळी शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा संघटक दीपक नाईकनवरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष गणेश पवार, करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे, होंडा रभा विभाग प्रमुख राजगुरू गणेश देशमुख, बापू पाटील आणि प्रहार सैनिक उपस्थित होते..

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE