केत्तुरात उद्घाटक पालकमंत्री दत्तात्रय भरणे तर अध्यक्षस्थानी संजयमामा ; विविध आश्वासन
केतूर ( अभय माने)
ग्रामीण भागातील तरुणांनी आपल्या करियरसाठी गांभीर्याने पाहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

केतूर (ता.करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालयात कै. निर्मला विनायक कोकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकरे परिवार पणदरे (ता. बारामती) व पाटील परिवार केतूर (ता.करमाळा)यांनी बांधलेल्या अद्ययावत अभ्यासिकेच्या लोकाअर्पण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे हे होते.

विद्यार्थ्यांनी मोबाईल व अन्य गोष्टींमध्ये आपला वेळ वाया न घालवता तोच वेळ आपल्या करिअरसाठी अभ्यासिकेत घालवावा असे मत माजी आमदार विजयराव मोरे व्यक्त केले. तर गणेश करे पाटील यांनी अभ्यासिकेसाठी एक लाख रुपयांची पुस्तके देणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शाळेच्या विकासासाठी तसेच शाळेच्या क्रीडांगण तसेच इमारतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी देऊ असे आश्वासन दिले. तसेच आज बालकदिन असल्याने सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी विद्यालयात लवकरच सायन्स शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले.
आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की, कोरोना काळातच दोन वर्षे गेली यापुढे होणारा विकास कोणीही थांबवू शकत नाही. सर्वांच्या सहकार्याने तो आपण करू तसेच तालुक्यातील विजेचा प्रश्न आपण सोडविणार असल्याचे सांगून सध्या सुरू असलेल्या वीज सबस्टेशनची कार्यक्षमता वाढवून नवीन सबस्टेशनसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलासाठी 55 कोटी रुपये मंजूर करून घेण्यात यश आले असून, येत्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले यावेळी एडवोकेट बी.डी. कोकरे,रामराव पाटील,उदयसिंह मोरे पाटील,गणेश करे पाटील,युवराज भोसले,जयसिंगराव,सुभाष,सुर्यकांत पाटील,राजेंद्र बाबर,नवनाथ भांगे,सुहास गलांडे,रामदास गुंडगिरे,महादेव नवले,तानाजी झोळ,डॉ.अमोल दुरंदे,डॉ.गोरख गुळवे,राजेंद्र धांडे,भास्कर भांगे,संग्राम पाटील,नारायण शेंडगे,विलास कोकणे, अॅड.अजित विघ्ने,रामदास कोकरे,योगिता कोकरे, आदीसह तालुक्यातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती शेवटी अॅड.रोहन कोकरे यांनी आभार मानले.