करमाळ्यातील एका ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायत ओडीएफ प्लस – स्वामी

करमाळा समाचार 

जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायती स्वयं घोषणेने हागणदारीमुक्त अधिक (ओ डी एफ प्लस) होणार असून आणखी 10 अशा एकूण 21 ग्रामपंचायती यात समावेश होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्ह्यातील हागणदारी मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ही चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने सुरुवातीच्या अकरा झाल्या. त्यात दहा ची भर पडणार आहे.

स्वच्छ भारत मिशन 2018 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. सध्या जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे.

यामध्ये करमाळा- सरपडोह, माढा – फुटजळगाव, माळशिरस – मांडवे, मंगळवेढा- देगाव, मोहोळ – अनगर, सांगोला – यलमार व मंगेवाडी, पंढरपूर – तावशी, उत्तर सोलापूर- शिवनी, दक्षिण सोलापूर – माळेगाव, अक्कलकोट- चपळगाव, बार्शी – ढोराळे अशा एकूण अकरा ग्रामपंचायतीने ओडीएफ प्लस झाल्याची स्वयंघोषणा केली आहे. 15 ऑगस्टला याबाबत ग्रामसभेत ठराव करणार आहे.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!