पाटबंधारे विभागाने मांगी तलावाचे मुख्य दरवाजे तातडीने दुरुस्त करावे
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा तालुक्यातील मांगी तलावावर अनेक गावे अवलंबून आहेत. सध्या उभ्या असलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. यावर्षी तलावात पाणी भरपूर आहे. याअगोदर 2017 पासून कोरडा ठाक असलेला तलाव हा गत वर्षी निसर्ग कृपेने भरला असून बऱ्यापैकी पाणी तलावात आले आहे. परंतु पाटबंधारे विभागाचे या कडे दुर्लक्ष आहे. गेली अनेक वर्षे तलावात पाणी नसल्याने तालावची अत्यंत दुरावस्था झालीय पाणी सोडण्यासाठी जे मेन दरवाजे असतात ते नादुरुस्त झालेत. चाऱ्याची व्यवस्थित दुरुस्ती झालेली नाही. फेब्रुवारी मधील नियमित आवर्तन 4 तारखेला उजव्या व डाव्या कालव्यातून सोडले 15 दिवसाचे आवर्तन पूर्ण झाल्यावर नियमाने पाणी बंद करायला हवे होते. परंतु मेन दरवाजे नादुदुरुस्त असल्याने पाणी बंद होतच नाही.

आज 20 ते 25 दिवस होत आले पाणी गळती चालू असल्यानं उजवा कालवा भरून वाहतोय. पर्वा मांगी येथील समाजसेवक सुजित बागल तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी दिवसभर प्रयत्न केले. पाणी तात्पुरते बंद झाले परंतु दुसरे दिवशी परत मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यातून सुटले. हि वेळ केवळ पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असल्याने आली आहे. मांगी तलाव लाभक्षेत्रातील मांगी सह वरील गावानी गेली 3 ,4 वर्ष पिण्याचे पाण्याचा संघर्ष केलाय तो अख्ख्या तालुक्याला माहीत आहे. पिण्याचे एका हंड्यासाठी दोन किलोमीटर जावे लागत होते. ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे व जनावरांचे , प्रचंड हाल झाले. त्यामुळे आम्हाला मांगी तालावतून एक थेंब हि वायला घालवायचा नाही असे मत मांगी येथील प्रवीण अवचर यांनी वेक्त केले.

तसेच येत्या 2 दिवसात जर हे दरवाजे दुरुस्त नाही केले पाण्याचे अवर्तनाचे योग्य नियोजन नाही केले तर मांगी तलाव संघर्ष समिती तीव्र आंदोलन करण्याचे तयारीत असल्याच समितीचे सदस्य शेतकरी संभाजीराजे बागल, अशोक नरसाळे, संदीप शेळके, शिवा जगदाळे , किशोर बागल आदींनी पाटबंधारे विभागाला इशारा दिला आहे.