करमाळासोलापूर जिल्हा

भीमा कोरेगाव परिसरातील जमावबंदीचा आदेश रद्द करण्यात यावा

प्रतिनिधी सुनिल भोसले

1जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भीम अनुयायी भिमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु कोरोना महामारीचे कारण देत पुणे जिल्हा प्रशासनाने भिमा कोरेगाव परिसरात दि.30 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केलेला आहे. तो आदेश हुकूमशाही आणी जातीय व्देषातून दिला आहे. तो रद्द करून भीम अनुयायींची प्रसासनाने योग्य ती सोय करावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असून, लोकांना लसी दिल्याच्या बातम्या येत आहेत. हा लोकांना घाबरवण्याचा व त्यांना मानसिक त्रास देण्याचा उद्देश्य आहे. कोरोनाच्या नावावर जनतेला मूर्ख बनवू नका, घाबरवू नका. सध्या जवळ -जवळ सगळीच देवस्थाने, प्रार्थना स्थळे जनतेसाठी खुली केली आहेत. मग भीमा कोरेगाव याच ठिकाणी जमावबंदीचा आदेश हा जातीवाद नाही का ?

इतर राजकीय पक्ष , संघटना यांचे मोर्चे, आंदोलने, लग्न समारंभ, नेत्यांचे वाढदिवस, अंत्यविधी कार्यक्रम , निवडणूक प्रचार, सभा, हे सर्रासपणे होत आहेत. तिथे कोरोना नडत नाही. आणि फक्त भीमा कोरेगावाला गेल्यानेच कोरोना वाढतो का? गल्ली बोळात न जमण्याचे कारण कोरोना आहे का? बरोबर ३१-१-आणि २ तारखेलाच भीमा कोरेगावला कोरोनाचा धोका आहे का ? जिथे फक्त लाखो लोकं येतात. मग हे दिल्लीला दीड कोटी शेतकरी एक महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. त्यांच्यामुळे कोरोना होणार नाही काय?
पुणे जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा जातीयवादी आदेश तात्काळ मागे घ्यावा आणी भिमा कोरेगाव शौर्यदिनाचे उत्तम प्रकारे नियोजन करावे असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE