पाटील व बागल गटाकडुन चौघांची नावे निश्चित ; निवडणुक अविरोध च्या दिशेने
करमाळा समाचार
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल पाटील व जगताप युती झाल्यानंतर बागल व पाटील यांना प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्यावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. तर आता ती उत्सुकता जवळपास संपलेली असून केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दिसून येत आहे.

बागल गटाकडून
कुलदीप पाटील, काशीनाथ काकडे
पाटील गटाकडून
नवनाथ झोळ आणि बाळासाहेब पवार
यांची नावे समोर येत आहेत. तर अद्यापही शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेणाऱ्यांवर सस्पेन्स बाकी आहे. केवळ चार अर्ज शिल्लक राहिले होते. त्यांनीही अंतीम क्षणी माघार घेतल्याने निवडणुक अविरोध होणार असल्याचे दिसत आहे.

तर जगताप गटाकडुन सहकारी संस्था मतदारसंघ – सर्वसाधारण : -_ १) जयवंतराव जगताप ,२ )शंभूराजे जगताप ,३ )जनार्धन नलवडे ,४ ) महादेव कामटे , ५ ) तात्यासाहेब शिंदे , ६ ) रामदास गुंडगीरे ,७) सागर दोंड ; ओबीसी : – १) शिवाजी राखुंडे ; एनटी : – १) नागनाथ लकडे ; *महिला : – १) सौ .शैलजा मेहेर ,२) सौ . साधना पवार असे नावे आहेत. तर व्यापारी मधुन परेशकुमार दोशी, पितळे मनोज (जगताप गट) व हमाल तोलार मधुन रोडगे वालचंद (सावंत गट)