आरोग्याच्या दृष्टीने जिंतीचे पुढचे पाऊल ; सवितादेवी राजेंभोसलेंच्या प्रतत्नाना यश
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
करमाळा तालुका हा आरोग्य सुविधांमध्ये खूप मागे असून करमाळा तालुक्यातील गोरगरिबांसाठी चा दवाखाना म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख आहे.असा गोरगरीबांचा दवाखाना जिंतीत पहिल्यांचा आयुर्वेदिक दवाखान्याच्या रूपाने सुविधांनी जिंतीत प्रथम सविताराजे भोसले यांचे प्रयत्नातून उभा राहिला. या दवाखान्यात उपचार जरी मोफत असले तरी तो गोरगरिबांना अजून कमी सोयीचा वाटू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना जिंती येथे उभा राहावा म्हणून गेल्या 10 वर्षांच्या सवितादेवी राजेभोसले यांचे प्रयत्नातून मा उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते-पाटील यांचेकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान केंद्रीय निधी उपलब्ध झाला. निधी उपलब्ध होऊन जागेचा प्रश्नावर राजेभोसले परिवाराने शासकीय दवाखान्यासाठी विनामोबदला 30 गुंठे जमिन दानपञ दिली.

आज जिंती व परिसरातील आरोग्यविषयकचे कामाचे सर्व श्रेय जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांना जाते.आपला भाग सुविधायुक्त व्हावा म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला ही सुविधा जरी तुटपुंजी असली तरी आरोग्य दवाखान्याचे काम कौतुकास्पद आहे.
राजकारणाच्या पायी श्रेयवादाची लढाई तालुक्यात पाहवयास मिळत असून इंदापूर बारामती अकलूज माळसिरस या तालुक्यातील आरोग्य सुविधा ही किती पुढे गेलेली आहे.ही बाब खरी असून आपल्या करमाळा तालुक्यातील आज कोरोना परिस्थिती खूप भयावह असताना पेपरबाजी न करता,मी पणा बाजूला सारून आपल्या नेत्याला खूश करण्यासाठी डोंगर पोखरून उंदीर काढण्याचे काम करण्याऐवजी जबाबदारीने आपण आपल्या तालुक्यासाठी, गटासाठी, गावासाठी, कुटूंबासाठी, स्वत:साठी काही विचार करून करू शकतो का? हाच विचार मनाशी बाळगून कोरोना लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न करूया!

आज कोरोनावर मात करण्यासाठी कोविड लस,रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा होत असून जिंती व कोर्टी येथे लस कमी प्रमाणात वितरीत झाली व कित्येक लोकांना माघारी जावे लागले.पुन्हा जास्तीत जास्त लससाठी प्रयत्न सुरू आहेत.
पश्चिम भागातील जिंती येथे 30 बेड व कोर्टी येथे 10 बेडचे कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी मत मांडले.