करमाळासोलापूर जिल्हा

माढा, करमाळा रुग्णांचे कोरोनामुळे हाल ; खासदार साहेब तुमची काहीच जबाबदारी नाही का ?

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी ऑक्सीजन बेड, रेमडीसिवीर इंजेक्शन, लस व कोविड केअर सेंटर मध्ये बेडचा अपुरा पुरवठा असतानाही नेते मंडळींकडून पाहिजे तितके काम होताना दिसून येत नाही. तालुक्याची जवाबदारी फक्त आमदाराची आहे का ? लोकसभेला मतांचा जोगवा मागायला आलेले खासदार कुठे आहेत ? असा प्रश्न आता लोकांना पडला लागला आहे.

खासदार साहेब तुम्ही ज्या तालुक्यांमध्ये मतांसाठी रात्रीचा दिवस केला आज त्याच तालुक्यातील रोज कितीतरी नागरिक कोरोणाच्या लाटेत मृत्युमुखी पडत आहे. राज्यात तुमचे सरकार नसले तरी केंद्रात मात्र तुमचे चांगलेच वजन आहे असे आम्ही ऐकून आहोत. मग त्या वजनाचा उपयोग स्वतःसाठी पदे घेण्यापेक्षा जनतेसाठी उपयुक्त कामासाठी का करू नये असा प्रश्न तुम्हाला पडत नाही का ?

सध्या माढा, करमाळा, अकलूज-माळशिरस या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे. हा भाग आपल्याच मतदारसंघात येतो ना ! खरंच एखादं संकट आलं तर परकीय व्यक्ती ही त्या ठिकाणी जाऊन आपले योगदान देतो. पण हा तर तुमचाच मतदारसंघ व याच मतदारसंघाच्या जीवावर आपण निवडून आला आहात. अतिवृष्टी झाली तरीही आपण आला नाही. बोभाटा झाल्यानंतर हजरी मात्र लावली. निवडणुकांसाठी तसेच लहानसहान कार्यक्रमांसाठी आपणाला वेळही असतो. एखादा पदाधिकारी फुटला म्हणून त्याला सांत्वन करण्यासाठी बैठकाही होतात.

पण आता कोरोना काळ आहे. या काळात सहकार्य, योगदान जरी देता येत नसेल तर माणुसकीच्या नात्याने धीर मात्र दिला पाहिजे. पण कोरोना महामारी च्या काळात खासदारांचे ही काही काम असू शकते हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळेच का काय आज आपण आपले वजन वापरून करमाळा, माढा, माळशिरस व आपल्या भागातील गावांमध्ये ऑक्सीजन बेड व परिसर यात तुटवडा असल्याकडे लक्ष दिले नाही. तरी नागरिक आपल्याकडूनही मदतीची अपेक्षा करत आहेत. आपले वजन वापरत या अपुऱ्या सुविधा पूर्ण करण्याचं काम करावं असं तुम्हाला ज्या लोकांनी मतदान दिले अशा लोकांना वाटत आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE