प्रहारच्या निवेदनाची घेतली नीरा-भीमा कारखान्याने दखल
करमाळा समाचार
गेल्या पाच ते सहा महिन्यापासून इंदापूर लगत माढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस नीरा-भीमा या कारखान्याला गेला होता शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यापासून कारखान्यावर हेलपाटे घातले पण त्यांच्या हाती निराशेशिवाय काहीच आले नाही.

नंतर सोलापूर जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी नीरा-भीमा कारखान्यावर जाऊन दहा तारखेपर्यंत उसाचे बिल दिले नाही, तर प्रहार स्टाईलने कारखाना ताब्यात घेऊन आंदोलन करण्यात येईल या आशयाचे पत्र देण्यात आले. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज दिनांक 08/06/2021 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस लाखांच्या आसपास ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.

यावेळी सुरली गावचे युवा नेते गणेश पवार .करमाळा तालुक्याचे प्रहार तालुकाध्यक्ष .संदीप तळेकर. गोकुळ भानवसे .राजेंद्र जगताप. योगेश घाडगे, अशोक मुळे, मारुती पवार, गजानन सुतार, अनेक प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यापासून बिलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रहार च्या या निवेदनामुळे त्वरित ऊस बिल मिळाले त्यामुळे शेतकरी वर्गातून यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला आणि यावेळी सोलापूर प्रहारच्या टीमचे तोंड भरून कौतुक करण्यात आले.