वृद्ध दांपत्याला अर्ध्या प्रवासातुन उतरवले खाली ; करमाळा आगारातील वाहकाकडुन निंदणीय प्रकार
समाचार टीम
मागील वर्षी एसटी चालक व वाहक यांच्या अडचणीसाठी त्यांनी पुकारलेला बनतात एक प्रकारे लोकांनीही प्रतिसाद दिला होता. त्यांना कधीच धारेवर न धरता त्यांच्यासाठी त्रास सहन करून ही लोक रस्त्यावर उतरले नव्हते. पण आज त्याच एसटी मधील वाहकाने केवळ पैसे सुट्टे नसल्याच्या कारणावरून वृद्ध दांपत्याला गाडीतून खाली उतरून त्यांना पायी जाण्यास भाग पाडले आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना उतरवले त्या ठिकाणाहून दुसरी गाडी मिळणे ही शक्य नसल्याचे हे माहीत असताना सदरचा प्रकार हा वाहकाच्या वतीने करण्यात आला आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून अशा लोकांवर कारवाईची गरज आहे.
आज सकाळी करमाळा कर्जत गाडीमध्ये सात वाजून पंधरा मिनिटांनी एक दांपत्य नागोबा मंदीरापासुन बसले. त्यांना आठ ते दहा किमी लांब असलेल्या भोसे येथे जायचे होते. पण त्यांच्याकडे शंभर रुपयांची नोट असल्याने सुट्टे पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या दांपत्याला गाडीतून उतरण्यात आले.
दादा धनवे व छबुताई धनवे असे त्या दांपत्याचे नाव आहे. अशा पद्धतीने या वृद्ध दाम्पत्याला गाडीतून उतरले जात असेल तर एसटीच्या या कर्मचाऱ्यांकडे थोडीशी माणुसकी शिल्लक नाही का असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे. परिसरातून तालुका पत्रकार संघाची अध्यक्ष महेश चिवटे जात असताना सदरचा प्रकार हा त्यांच्या लक्षात आला. त्यांनी या प्रकाराबद्दल त्या दांपत्याला बोलते केले. तर आता स्वतः पत्रकार संघ या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
ज्या लोकांनी तुम्हाला अडचणीच्या काळात असल्याचे पाहून तुमच्यासाठी अनेक त्रास सहन करून सुद्धा तोंडातून ब्र शब्द काढला नाही अशा लोकांना जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर पुढील काळात लोक तुमच्यासाठी त्रास सहन करून घेण्यापेक्षा तुम्हाला तुमची योग्य दाखवा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे वेळीच स्वतःमध्ये सुधारणा करून घ्या अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार असाल.