सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आता फक्त घोषणा बाकी
करमाळा समाचार
सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर आज निवड होणार आहे. त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजता अर्ज स्विकारण्याची सुरुवात झाली. तर बारा वाजेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने एकमेव दाखल झालेला अर्ज उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांचा असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

उर्वरित काळासाठी विरोधकांनी कोणताही रस दाखवला नाही हे दिसून आले. तर पाटील गटाकडे दहा जागांमधुन सहापेक्षाही अधिक बहुमत असल्याचे बोलले जात असल्यामुळेच विरोधी गटाने कोणतेही लक्ष या निवडीकडे न दिल्याचे दिसून आले. या निवडीवेळी अतुल पाटील यांना सूचक म्हणून माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी काम पाहिले.
