करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

इराणच्या व्यापाऱ्यांना तालुक्यातील केळींची भुरळ

चिखलठाण ( बातमीदार)

करमाळ्याच्या केळीची इराणला चांगलीच भुरळ पडली असून इराणचे केळी व्यापाऱ्यांनी शेटफळ ता करमाळा येथील केळीच्या बागांची पाहणी करून येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. केळीबरोबरच इतर फळपिकांचाही मागणी इराण येथे असून पेरू, डाळींब व सिताफळ या फळपिकांचा व्यावसाय करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

शेटफळ येथिल पंचेचाळीस ते पन्नासहून किलो घडाच्या केळीच्या घडांच्या बागा पाहून इराणी खुष झाले. इराणमध्ये वर्षभर भारतीय केळीची मागणी आहे. भारतातील थेट शेतकऱ्यांबरोबर आपण व्यापार करण्यात उत्सुक असून इराण देशात विविध फळांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. यामध्ये वर्षभर विविध पिकांना मागणी असल्याचे इराणी व्यापारी व्यापारी यांनी शेटफळ येथील लोकविकास फार्मर प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले. यावेळी वीस वर्ष भारतात व्यवसाय करत असलेल्या महमंद अली यांनी शेतकऱ्यांशी दुभाषीचे काम केले.

शेटफळकरांनी मराठमोळ्या पद्धतीने इराणच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी बांधलेल्या कोल्हापूरी फेट्याचे मोठे अप्रूफ या परदेशी पाहुण्यांना वाटत होते तर आपल्या मायदेशी व्हिडिओ कॉल करून त्यांनी बांधलेले फेटे आपल्या घरच्या मंडळींना मोबाईलवर दाखवत होते. करमाळा येथे आल्यानंतर त्यांनी शेटफळ, केडगाव व कंदर कंदर येथील येथील केळीच्या भागांची व कोल्ड स्टोरेजची पाहाणी केली. कंदर येथे के.डी .एक्स्पोर्टचे किरण डोके यांनी त्यांचे स्वागत केले तर टेंभुर्णी येथे केळी निर्यातदार दत्ता माळी यांनी त्यांना विविध प्रकारची महीती दिली. शेटफळ येथे लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना सुरुवातीला सनरिया ऍग्रोचे अमोल महाजन यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी इराण येथील केळी व्यवसायिक. महंमद रिजाई व अरॅश घाशेमी यांनी आजपर्यंत आमचा संपर्क देशातील केळी व्यापाऱ्यांशी आला आज प्रथमच आम्ही थेट केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे करमाळा तालुक्यातील केळी ही इराणमध्ये मोठी मागणी आहे आहे वर्षभर आपण केळी घेऊ शकतो परंतु अरे अमेरिकेचे काही आर्थिक निर्बंध आमच्या देशावर असल्याने पैसे देवाणघेवाणीत काही अडचणी येतात अशावेळी आमच्या येथे उत्तम पद्धतीने पिकणारी ड्रायफ्रुट , सफरचंद , केवी यासारखी पिके आम्ही योग्य किमतीमध्ये तुम्हाला देऊ शकतो याचाही जरूर विचार करावा. लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, विष्णू पोळ, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे , गजेंद्र पोळ,विजय लबडे लबडे गंगाधर पोळ यांच्यासह लोकविकास कंपनीचे सभासद शेतकरी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE