कार्यकर्त्यांचा मेळ घालुन पक्ष कार्य व समाजकारण करणार
करमाळा समाचार
स्व.नामदेवरावजी जगताप व स्व.दिगंबरावजी बागल मामा यांच्या काळात काॅग्रेस पक्षास सुवर्ण दिवस होते. हे दोन अपवाद वगळता काॅग्रेस पक्ष करमाळा तालुक्यात रसातळाला जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाङीच्या घटक पक्षांना तसेच काॅग्रेस पक्षातील नव्या-जुन्यांचा मेळ घालुन पक्ष कार्य चांगले करू.

याच कार्या साठी , मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, आ.प्रणीतीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष ङाॅ.धवलसिंह मोहिते पाटील, प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले, अमित भैय्या देशमुख साहेब , सतेज पाटील साहेब व विश्वजीत कदम साहेब यांनी मला संधी दिली आहे. येणाऱ्या कालखंडात युवक काँग्रेस, महीला काॅग्रेस , सेवा दल, एन.एस.यु.आय (विद्यार्थी संघटना) ओ.बी.सी.सेल, सहकार सेल, कामगार युनियन इत्यादी सर्व काॅग्रेस पक्षाचे विभाग पुन्हा नव्या जोमाने त्यांना सर्वाथ ताकद देवुन काॅग्रेस पक्ष तालुक्यात आव्वल स्थानावर आण्णार आहे.
तसेच, कोणाच्या दुखा वरची खपली काढण्या साठी नव्हे तर नव्या आणि जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळ घालुन पक्ष कार्य व समाजकारण करणार, असे मत नुतन काॅग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
