वाहुन जाणारा व्यक्ती दुसराच ; व्हायरल विडिओ करमाळा तालुक्यातील नाही
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात ओढ्या नाल्यांना नदीचे रूप आले असून मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. याच पाण्यामध्ये आज एक इसम चालत जात असताना वाहून गेला आहे. तो करमाळा गुळसुळी रस्त्याने आपल्या सहकाऱ्यासोबत जात असल्याची माहिती मिळत आहे. ती व्यक्ती चालत जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला आहे.

पण सध्या सोशल मीडिया एक वेगळ्याच दुचाकी वर बसून वाहुन गेलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ करमाळा तालुक्यातील नसून बाहेरचा आहे अशी माहिती सध्या मिळत आहे. वाहून गेलेली व्यक्ती ही चालत जात होती. त्याच्यासोबत एक जोडीदारही होता. पण नेमके ते दोघे कोण होते. अद्याप ओळख पटलेली नसली तरीही ते गुडसडी रस्त्यावरील खंडागळे वस्ती चा फलक लावलेल्या परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

त्या परिसरात काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही मजूर येऊन राहत आहेत. त्यातील दोघे पाऊस सुरू होण्यापूर्वी घराबाहेर पडले होते. पण माघारी जात असताना पावसाचा अंदाज आल्याने एक जण माघारी फिरला. पण वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण तसाच पाण्यात पुढे गेला. काही कळण्याच्या तो त्या पाण्यात वाहून गेला सदरचे पाणी वेगवान असल्याने तो त्याला घेऊन गेले. संबंधित लोकांनी त्या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण पाण्याचा वेग व पाऊस असल्याने त्याचा शोध लागू शकला नाही.
तर करमाळा तालुक्यात सर्वत्र पावसामुळे वाहतुक विस्कळीत झालेली आहे. छोट्या मोठ्या ओढ्यांना पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी यामुळे करमाळा गुळसडी, कुर्डुवाडी रस्ता, पुणे रस्ता व अनेक छोटे मोटे रस्ते पाण्यामुळे बंद आहेत. तरी वाहत्या पाण्यातुन जाण्याचे धाडस कोणी करु नये असे आवाहन तहसिलदार समीर माने यांनी केले आहे.