करमाळासोलापूर जिल्हा

आळजापुरातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

करमाळा: तालुका प्रतिनिधी


आळजापुर तालुका करमाळा येथे एका शेतक-याने शेतातील बाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मोहन आजिनाथ रोडे (वय ४९ रा. आळजापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. याबाबतची हकिकत अशी की आळजापूर येथील मोहन रोडे हे सकाळी आळजापूर येथे गावातील दूध डेअरीत दूध घालून आले होते. त्यानंतर ते सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते.

यावेळी अज्ञात कारणाने त्यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याची खबर गौतम उध्दव रोडे रा. आळजापुर यांनी करमाळा पोलिसात दिली आहे. याबाबत करमाळा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याचा तपास हवालदार मारुती रणदिवे हे करीत आहेत. स्व. मोहन रोड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून ,भाऊ, भावजया, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE