करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पोंधवडी खुन प्रकरण अखेर उलघडले ; मंगळवारी झाला होता महिलेचा निर्घृण खुन

करमाळा समाचार 

पोंधवडी ता. करमाळा येथे झालेल्या खुनाच्या तपासात सर्व बाजूंनी शोध सुरू असून आतापर्यंत सात ते आठ संशय त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. यामध्ये मयत महिलेच्या पतीसह त्याच्या भावाचा व प्रियकराचा समावेश होता. मंगळवारी रात्री पोंधवडी येथील वस्तीवर महिलेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. यासंदर्भात श्वान पथक माध्यमातून व इतर तांत्रिक बाबी तपासल्या गेल्या यातुन मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला असुन पतीच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची अधिकृत घोषणा बाकी असली तरी तपास पुर्ण झाला आहे.

कोमल बिभीषण मत्रे वय २३ असे मयत महिलेचे नाव आहे. कोमल हीचे बिभीषण मत्रे यांच्यासोबत लग्न झाले होते. पण मागील तीन वर्षापासून कोमल ही आपल्या माहेरीच राहत होती. याशिवाय तिचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहितीही समोर आली होती. सदर प्रकरणांमध्ये मयत महिलेच्या आईने जावई व त्याच्या कुटुंबीयांवर संशय व्यक्त करत फिर्याद दिली आहे. त्यामुळे मयत महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला जात असला तरी अनैतिक संबंध व इतर बाबीही लक्षात घेऊन पोलीस तपास करीत होते.

यामध्ये पत्नी माहेरी राहत असल्याच्या रागातून पतीने सदरचा प्रकरण घडवले आहे का असा संशय व्यक्त करीत तपास सुरू आहे, तर अनैतिक संबंधातून संबंधित व्यक्तीने हे प्रकरण घडवले आहे का ? याबाबतही पोलीस शोध घेत होते. घटनास्थळी एक मोटरसायकल मिळून आली होती त्या लोकांकडेही शोध घेतला जात होता.

ads

सदरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक रोहित शिंदे, पोलिस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर दळवी, अजित उबाळे, सोमनाथ जगताप, तौफिक काझी, वैभव ठेंगल, मनिष पवार, ज्ञानेश्वर घोंगडे, अझर शेख, बालाजी घोरपडे, ढेंबरे यांच्या पथकाने छडा लावला आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE